अर्थ : नदी,तलाव इत्यादींच्या काठावर नावेतून उतरण्यासाठी वा बसण्यासाठी तसेच पाण्याचा उपयोग चांगला करता यावा यासाठी केलेली सोयीची दगडी बांधणी.
उदाहरणे :
बायका घाटावर कपडे धूत होत्या
अर्थ : वरच्या बाजूस मोठ्या पेल्यासारखी कडी असलेला व आतल्या बाजूला लोखंडी वा लाकडी लोळी लावलेला एक वाद्यविशेष.
उदाहरणे :
चिमाजी अप्पा पेशवे यांनी ह्या मंदिराला मोठी घंटा दिली आहे
समानार्थी : घंटा
अर्थ : डोंगर ओलांडून जाण्यासाठी डोंगरातून केलेला रस्ता.
उदाहरणे :
ही गाडी खंडाळ्याच्या घाटातून पुण्याकडे जाते.
अर्थ : सह्याद्रीच्या रांगेच्या पश्चिमेकडचा महाराष्ट्रातील प्रदेश.
उदाहरणे :
तुमचे गाव कोकणात आहे की देशावर?
समानार्थी : देश
अर्थ : नदी किंवा तलाव इत्यादीच्या किनारी तयार केलेला घाट जो स्नानासाठी वापरला जातो.
उदाहरणे :
कुंभमेळ्याच्या वेळी स्नानघाटावर खूपच गर्दी होते.
समानार्थी : स्नानघाट
अर्थ : जेथून लोकांना पाण्यापर्यंत पोहचता येईल असे तलाव,नदी इत्यादींच्या काठावरील पायर्या असलेले स्थान.
उदाहरणे :
लोक घाटावर स्नान करीत आहेत.
घाट व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. ghaat samanarthi shabd in Marathi.